Corona... Corona...
Sitting at Swargate Bus Depot, waiting for my bus to home. My head is still spinning. शुद्ध मराठीत अजूनही गरगरतय डोकं . 9 वाजता पोहोचले इथे . धावत पळत , जस मी नेहमीच करते. 9 ची बसच नव्हती पण. थेट 10. अरे देवा !वाट पाहावी लागणार. बसले मग. फार काही गर्दी नाहीये इथे. मधेच असं घरी जायचं कारण म्हणजे तो कोरोना . What the heck it has become! मला बिलकुल इच्छा नाहीये घरी जायची अजूनही. But still I am in the bus. Enroute to home. आज दुपारी क्लासला गेले होते. सगळे एकदम पॅक. नेहमी सारखी मस्ती नाही. सगळं जस धास्तावलेलं. कोणी खोकल तर लगेच सगळे अलर्ट. त्यात भर म्हणून मला मागचा महिनाभर पासून खोकला. उद्या पासून क्लास नाहीयेत - कोरोनाची नको असलेली कृपा. लायब्ररी नेहमी सारखी नाहीये. मेस चालवणारे काका आणि काकूंना पडलेली काळजी - पोर घरी निघालेत म्हणून पडणाऱ्या अनिश्चित सुट्ट्या, बिघडलेलं आणि अजून जे बिघडणार आहे असं पैशाचं गणित. कॉलेजला सुट्टी आहे पण परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार होणार अशी आड की विहीर आलेली नोटीस. Sanitisers साठी अचानक वाढलेली मागणी आणि मग पुढच्या 24 तासात...