Posts

Showing posts from September, 2021

Memories...

 आज मी माझ्या ज्युनिअर कॉलेज ला गेले होते.  काय भारी फिलिंग असतं ते. मस्तच! पुन्हा तोच पहिला दिवस आठवला. माझा कॉलेज चा पहिला दिवस. शाळेतून कॉलेजला जाणं- केवढी ती excitement होती. शाळेत टॉप केल होत. आता पुढे होत नवीन कॉलेज. शाळेत प्रवेश घ्यायची प्रक्रिया वेगळी. शाळेच वातावरण वेगळ. १० वर्ष तिथेच शिकले, खेळले, पडले कितीतरी वेळा, बक्षीस मिळवली, सगळ कसं ओळखीच होत. १० वर्षांपासून तसच.  जे काही थोडे फार  बदल झालेले तेवढाच काय तो वेगळेपणा त्या परिसरात. कॉलेजच सगळच वेगळ. प्रत्येक गोष्टीसाठी नोटीस लागणार. आपण जाऊन त्या चेक करायच्या आणि मग काम करायची. शाळेसारख वर्गात नाही येणार आता शिपाई काका उद्याच्या सुट्टीची किंवा वार्षिक सहलीची, स्नेसंमेलनाची नोटीस घेऊन.  Admissions सुरू झाल्यावर १०० रुपयांचा फॉर्म घेतला होता. केवढ्या काळजीनी तो फॉर्म भरून दिला होता. निकालाची आणि जातीच्या दाखल्याची प्रत जोडून सबमिट केला. दोन दिवसांनी लिस्ट लागणार. नंबर लागणार याची खात्री होती पण तरीही उत्सुकता ताणलेली. लिस्ट मध्ये आपल नाव बघायची.  मला आठवतंय, संध्याकाळी चार वाजता लिस्ट लागली होती ...