Posts

Showing posts from November, 2021

In/Formal

 मी आणि माझे दोन मित्र. स्टेशन वर होतो. तात्काळ च तिकिट काढायचं होत आम्हाला. मी पहिल्यांदाच बघत  होते की तात्काळ च तिकीट कसं काढतात. स्टेशन मध्ये गेलो. एका रांगेत सात आठ खिडक्या. काहींच्या बाहेर closed अस लिहिलेलं.  ६:४५-७ वाजले होते संध्याकाळचे. आमची ट्रेन ८:०५ ची. वेळ नव्हता जास्त हातात.  तिकीट काढायचे बाकी होते अजून. मला तर काहीच नव्हतं माहिती. आपली बॅग घेऊन एका मित्राच्या मागे मागे आम्ही सगळे. तो सगळं बघत होता तिकीट, ट्रेन्स. तात्काळ च ऑफलाईन तिकीट काढायला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि मग कन्फर्म झालं की आपलं तिकीट घ्यायचं पैसे भरून. शेवटच्या दोन खिडक्यांपाशी जरा गर्दी होती. तिथे जाऊन आम्ही पण उभे राहिलो लाईन मध्ये. मग तो मित्र म्हणाला त्या पलीकडच्या खिडकीत जाऊन बघ, फॉर्म मिळतोय का. मी गेले पण काही नाही. खिडकी पलीकडे बसलेल्या मॅडम बिझी होत्या. तेवढ्यात त्या मित्राचा आवाज आला की भेटले फॉर्म. दोन फॉर्म भरून द्यायचे होते आम्हाला. एक फॉर्म हातात देत मित्र म्हणाला की तुझ्या details लिही यात. पण पहिल्यांदाच फॉर्म बघितल्यानंतर मला जरा गडबडायला झालं. मग त्याने परत फॉर्...