In/Formal
मी आणि माझे दोन मित्र. स्टेशन वर होतो. तात्काळ च तिकिट काढायचं होत आम्हाला. मी पहिल्यांदाच बघत होते की तात्काळ च तिकीट कसं काढतात. स्टेशन मध्ये गेलो. एका रांगेत सात आठ खिडक्या. काहींच्या बाहेर closed अस लिहिलेलं. ६:४५-७ वाजले होते संध्याकाळचे. आमची ट्रेन ८:०५ ची. वेळ नव्हता जास्त हातात. तिकीट काढायचे बाकी होते अजून. मला तर काहीच नव्हतं माहिती. आपली बॅग घेऊन एका मित्राच्या मागे मागे आम्ही सगळे. तो सगळं बघत होता तिकीट, ट्रेन्स. तात्काळ च ऑफलाईन तिकीट काढायला एक फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि मग कन्फर्म झालं की आपलं तिकीट घ्यायचं पैसे भरून.
शेवटच्या दोन खिडक्यांपाशी जरा गर्दी होती. तिथे जाऊन आम्ही पण उभे राहिलो लाईन मध्ये. मग तो मित्र म्हणाला त्या पलीकडच्या खिडकीत जाऊन बघ, फॉर्म मिळतोय का. मी गेले पण काही नाही. खिडकी पलीकडे बसलेल्या मॅडम बिझी होत्या. तेवढ्यात त्या मित्राचा आवाज आला की भेटले फॉर्म. दोन फॉर्म भरून द्यायचे होते आम्हाला. एक फॉर्म हातात देत मित्र म्हणाला की तुझ्या details लिही यात. पण पहिल्यांदाच फॉर्म बघितल्यानंतर मला जरा गडबडायला झालं. मग त्याने परत फॉर्म घेतला आणि रांगेत त्याला एक काका भेटले होते त्यांच्याकडून पटकन फॉर्म भरून घेतला. मी बाजूला उभी होते. काकांनी फॉर्म भरून दिल्यावर मी पटकन "Thank you Kaka!!" म्हटलं. काकानीं काही रिप्लाय नाही दिला त्यावर आणि ते निघून गेले. पण माझ्या दोन्ही मित्रांनी माझ्या कडे असा कटाक्ष टाकला जसा की मी काही मोठ नियम तोडला आहे एखाद्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजर चा. मग दुसऱ्या मित्रांनी मला सांगितलं की काका काय म्हणत आहेस त्यांना, सर म्हणायचं असत. झालं. आमच्या तिकीट झाल्या आणि आम्ही वापस घरी परतलो.
तसं पाहायला गेलं तर छोटासा किस्सा. पण मी त्या काकांना काका म्हटल म्हणून काय बिघडलं ना? आम्ही काही प्रोफेशनल टूर वर नव्हतो गेलो, किंवा काही official काम ही नव्हत ते. आमच्या सुट्टीवरून परतताना स्टेशन वर एका माणसाने आम्हाला मदत केली. आणि मी त्यांना त्यासाठी धन्यवाद म्हटल. आणि पुढे काका. दादा च्या वयाचे असते तर दादा म्हटल असतं. सर किंवा मॅडम अस का म्हणू मी. उगाच formalise कशाला करायचं ना? साधं ताई, दादा, काका, काकी म्हटल तर काय बिघडत?
पुण्यात असताना मी आणि माझी मित्रमंडळी एका टपरी वर चहा पिण्यासाठी जायचो. तो टपरी वाला दादा एकदा असच चहा देताना "मॅडम" म्हंटला मला. मी काही कुठे काम वगैरे नव्हते करत. मला नाही आवडलं ते. उगीच formalised वाटत ते मला.
PMT मध्ये पण खूपदा ऐकलंय कंडक्टर ड्राइवर पॅसेंजर ना मॅडम म्हणताना. पण का माहिती नाही, हे नको तिथे सर/मॅडम ऐकायला आवडत नाही मला.
गरज आहे तिथे बोलायला हवं. कामाच्या ठिकाणी, official गोष्टींमध्ये, जिथे ते SOP असेल तिथे नक्की वापरा असे फॉर्मल शब्द. पण informal ठिकाणी अस formalisation मला नाही रुचत.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteNew blog post kra
ReplyDelete