माझा अवतार बघायचा राहिलाय...
अवतार मूवी बद्दल बोलतीये मी. स्टोरी सुरु होते जानेवारी महिन्यात. माझा एक मित्र आहे - तो घरी चालला होता. त्याआधी आम्ही भेटलो तर त्याने नेहमीसारख मला काही मूवीज शेअर केले. अवतार पण घे म्हणाला, पण माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. मग मी म्हंटलं नंतर घेते . नंतर 31 ला त्याला स्टेशनला सोडवायला गेले, तिथे पण त्याने आठवण केली की घे movie. आता असेल मोबाईल मध्ये जागा ; पण ट्रेन लगेच निघाली. तो पण मुहूर्त हुकला. परत जवळपास पंधरा वीस दिवसांनी त्यांनी पुन्हा आठवण केली. अवतार तसा बघितलाय मी आधी. पण खूप आधी. आता फारसं काही आठवत नाहीये त्यातलं. मग finally घेतला मी त्याचाकडून अवतार मोबाईलमध्ये आणि लगेच लॅपटॉप मध्ये टाकला , मैत्रिणीच्या, माझी रूम पार्टनर. त्या दिवशी काही माझा मूड नव्हता लगेच मूवी बघायचा. नंतर असच टाळाटाळ होत राहिली. त्यात "लॅपटॉपवरच बघ मूवी" असा त्याचा सल्ला होता. मोबाइलमध्ये असलं की आठवत ना लगेच फाइल्स चेक करताना, लॅपटॉप वर लक्षच नाही गेलं. आणि मग या कोरोना ने घोळ घातला. दोन चार दिवसातच सगळं change, सगळे आपापल्या घरी, तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी आणि लॅपटॉप मैत्...