कधी कधी...
कधी कधी असं होत ना... सगळ्यांची आठवण येते, खूप खूप एकटं वाटत, पण कुणाशी बोलायची इच्छा नसते, कुणालाच भेटायच नसतं, रडायच असतं खूप, पण रडायची सुद्धा इच्छा नसते, डोळ्यात मात्र भरभरून पाणी आलेलं असतं. खूप सारे फोन नंबर फक्त डायल केलेले असतात, रिंग व्हायच्या आधीच कट केलेले असतात, खूप सारे मेसेज टाइप केलेले, तसेच डिलिट झालेले असतात, असं का होत असेल ??? एवढं एकाकीपण असं अचानक का वाटत असेल??? माहिती नाही। पण याचा शोध घ्यायचा आहे.