Memories...
आज मी माझ्या ज्युनिअर कॉलेज ला गेले होते.
काय भारी फिलिंग असतं ते. मस्तच!
पुन्हा तोच पहिला दिवस आठवला. माझा कॉलेज चा पहिला दिवस.
शाळेतून कॉलेजला जाणं- केवढी ती excitement होती. शाळेत टॉप केल होत. आता पुढे होत नवीन कॉलेज. शाळेत प्रवेश घ्यायची प्रक्रिया वेगळी. शाळेच वातावरण वेगळ. १० वर्ष तिथेच शिकले, खेळले, पडले कितीतरी वेळा, बक्षीस मिळवली, सगळ कसं ओळखीच होत. १० वर्षांपासून तसच. जे काही थोडे फार बदल झालेले तेवढाच काय तो वेगळेपणा त्या परिसरात. कॉलेजच सगळच वेगळ. प्रत्येक गोष्टीसाठी नोटीस लागणार. आपण जाऊन त्या चेक करायच्या आणि मग काम करायची. शाळेसारख वर्गात नाही येणार आता शिपाई काका उद्याच्या सुट्टीची किंवा वार्षिक सहलीची, स्नेसंमेलनाची नोटीस घेऊन.
Admissions सुरू झाल्यावर १०० रुपयांचा फॉर्म घेतला होता. केवढ्या काळजीनी तो फॉर्म भरून दिला होता. निकालाची आणि जातीच्या दाखल्याची प्रत जोडून सबमिट केला. दोन दिवसांनी लिस्ट लागणार. नंबर लागणार याची खात्री होती पण तरीही उत्सुकता ताणलेली. लिस्ट मध्ये आपल नाव बघायची.
मला आठवतंय, संध्याकाळी चार वाजता लिस्ट लागली होती आणि मी पहिली होते तिथे जाऊन लिस्ट बघणारी. कॉलेज शांत होत संध्याकाळी, अंधारून आल्यासारख झालं होत व्हरांड्यात. फार गजबज नव्हती. दुसऱ्या दिवशी जाऊन admission घेतल. केवढी ती गर्दी. शाळेपेक्षा खूपच वेगळ जग. इथून पुढे दोन वर्ष इथेच काढायची. याच ऑफिच च्या खिडक्यांमध्ये. प्रत्येक वेळी असच लाईन मध्ये उभे राहून काम करायची होती. लाईन मध्ये लागायच, lunch break च्या आधीच आपल काम उरकून घ्यायचंय याची खबरदारी बाळगायची. नोटीस बोर्ड चेक करत राहायचे. यात भाग घ्या, त्यात भाग घ्या. लेक्चर बंक नाही करायचे. Etc. Etc. Etc.
माझा कॉलेज जुनं. मुंबई - गोवा महामार्गावर एकदम. आता रस्त्याचं काम सुरू आहे तर अजून थोड आत सरकलय कॉलेज. पण अजूनही हायवे वरच आहे. कौलारू छत. Main entry समोर कारंज्या. बैठी इमारत आहे. फक्त ground floor. Main building मध्ये फक्त एकच वर्ग आहे पहिल्या माळ्यावर. कॉलेज मधला सगळ्यात मोठा वर्ग आहे तो. खूप दिवस तर वर जायचा जिना कुठे आहे तेच माहिती नव्हता मला. नवीन बांधलेल्या इमारती आहेत दोन मजली. लायब्ररी फर्स्ट floor ला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच एवढी मोठी लायब्ररी आणि एवढं मोठ वाचनालय बघितलं होत. त्यानंतर आता खूप लायब्रऱ्या बघितल्या आहेत, पण तिची जागा खास.
८ जुलै २०१३. कॉलेजचा पहिला दिवस. ९ ची वेळ. घरातून ८:१५ ला निघाले. कॉलेज घरापासून ८-९ किलोमीटर दूर. जायला विक्रम. विक्रम म्हणजे टमटम. तीन चाकांची काळी पिवळी टॅक्सी म्हणू शकता. टॅक्सी सारखी नाही दिसत पण ती. निळ्या रंगाचा अनारकली टाईप घेर असलेला ड्रेस घातला होता.
कानात काहीच नव्हत. कानाला दुख झालं होता म्हणून कानातले काढून ठेवले होते खूप दिवस. पण मला वाटायचं की कानातले नाही घातले आहेत तर मी छान नसेल दिसत. एक वेगळाच न्यूनगंड होता मनात तेव्हा. आता कधी तरी बाहेर जाणार असेल तरच कानातले घातले जातात. नाहीतर इतरवेळी असेच मोकळे असतात कान. पण आता तसा काही न्यूनगंड नाही आहे. आपण आतूनच छान असलो की बरोबर छान दिसतो, हे चांगलंच उमगल आहे आता. Life lessons! उतरले टमटम मधून. अर्ध्या तासाचा रस्ता. पटकन संपला. समोर कॉलेजची कमान. रस्ता क्रॉस केला. गेट पासून तिरका असा सरळ रस्ता मेन building पर्यंत चा. तिथून उजवीकडे सरळ शेवटचा वर्ग. अजूनही सगळं कस जसच्या तस डोळ्यांसमोर उभं राहतं. भारी वाटत. Nostalgic!
भारी होते ते दोन वर्ष. ज्युनिअर कॉलेज आणि सीनिअर कॉलेज मधे बराच फरक असतो. अभ्यास, आपण, आपल वय, समज, आजूबाजूची माणसं, जागा सगळंच फार वेगळं असतं. आधी सगळे लहान म्हणून वागवत असतात आणि सीनिअर कॉलेज ला अचानक मोठे झालो आता थोडे अशी feeling यायला सुरू होत. त्यात पुढच्या शिक्षणासाठी बाहेर कुठे गेलो तर अजूनच नाविन्य पुढे उभ असतय. छान अनुभव असतो पण सगळा. भरभरून जगावं असा तो काळ. आयुष्यात नेहमीच भरभरून जगावं माणसानं. पण कॉलेज चे दिवस जास्तच स्पेशल असतात. नेहमीच. आणि कायमसाठीचे.
Kay sundar lihtes khupach chhan khup chhan writter ahes tu
ReplyDeleteThank you.
Delete