आघात...
रोजच्या सारखाच उगवला दिनकर,
रोजच्या सारखाच वाजला गजर,
रोजच्या सारखे नव्हते मात्र कॉलेज,
साडेदहाची रोजची वेळ...
आज मात्र होते साडेआठचे कॉलेज.
घाई गडबडीत सर्व आवरून,
निघाले आनंदाने घरातून,
कॉलेजच्या गेटमध्ये प्रवेश घेतला,
वेळेवर पोहोचल्याचा सुस्कारा सोडला.
वर्गात जाण्याच्या मार्गावर होते,
समोरून येत होत्या दोन सखी,
मी होते आनंदी, हसतमुखी,
त्या मात्र दिसत होत्या गंभीर-दुःखी.
मी थांबले जवळ जाऊनी,
त्या पण आल्या जवळी,
पाहिल्या तीन शब्दांनी त्यांच्या
जनु बंद पडले हृदय...
ते शब्द होते-
माझ्या जिवलग मैत्रीणीचे,
माझ्या सखी-सोबतीचे,
वडील वारले...
चुकला हृदयाचा ठोका,
श्वास जणू थांबला,
धक्का असला बसला,
डोळ्यात अश्रूही न आला,
जणु शरीरावरच माझ्या आघात झाला...
रोजच्या सारखाच वाजला गजर,
रोजच्या सारखे नव्हते मात्र कॉलेज,
साडेदहाची रोजची वेळ...
आज मात्र होते साडेआठचे कॉलेज.
घाई गडबडीत सर्व आवरून,
निघाले आनंदाने घरातून,
कॉलेजच्या गेटमध्ये प्रवेश घेतला,
वेळेवर पोहोचल्याचा सुस्कारा सोडला.
वर्गात जाण्याच्या मार्गावर होते,
समोरून येत होत्या दोन सखी,
मी होते आनंदी, हसतमुखी,
त्या मात्र दिसत होत्या गंभीर-दुःखी.
मी थांबले जवळ जाऊनी,
त्या पण आल्या जवळी,
पाहिल्या तीन शब्दांनी त्यांच्या
जनु बंद पडले हृदय...
ते शब्द होते-
माझ्या जिवलग मैत्रीणीचे,
माझ्या सखी-सोबतीचे,
वडील वारले...
चुकला हृदयाचा ठोका,
श्वास जणू थांबला,
धक्का असला बसला,
डोळ्यात अश्रूही न आला,
जणु शरीरावरच माझ्या आघात झाला...
Comments
Post a Comment