नवीन आहे गोष्ट...
नवीन काहीतरी म्हंटलं की किती काय काय सुचतं ना. माझ्या तर नावाच्या अर्थातच imagination आहे, (जरा जास्त research केल्यावर सापडेल ते) म्हणून माझी कल्पनाशक्ती जरा जास्तच चांगली आहे. नाहीतर पल्लवी म्हणजे काय ते सोपं आहे. पण जे पुढे लिहिणार आहे ते अजून जरा वेगळं आहे.
पण नवीन गोष्टींची भीती वाटते ना. अनुभव नसतो, सवय नसते. मुख्य मुद्दा तर सवयीचा असतो. खूपदा असं होत कि गोष्ट नवीन आहे म्हणून नाही तर तिची सवय नाहीये आपल्याला म्हणून नकळत नाकारली जाते ती, नकळत.
सध्या खूप गोष्टी बदलत आहेत. त्या तर नेहमी पासूनच बदलत आहेत. फरक एवढाच की आता तो बदल मला जाणवतो आहे, माझ्या निरीक्षणात येत आहे, मला कळतो आहे.
फार साध्या गोष्टी आहेत.
गेल्या महिन्यात मामाकडे गेलो होतो. बाहेरच ओट्यावर बसलो सगळे. मस्त बाज टाकलेली होती. मामा पाणी घेऊन आला घरातून. Normally मामीच काम ना ते. पण एक बदल जाणवला. या आधी असं काही झालं तर आठवतंय मला, आई सांगायची - अरे उठ बेटा, मामा पाणी देतोय. जा आत जाऊन पाणी घेऊन ये सगळ्यांना.
पण यावेळी मी हि नाही उठले आणि आई नी पण आठवण नाही केली. मामानी घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी दिलं, नवीन काहीतरी, ते पण कुठे मेट्रोसिटी मधे नाही, साधं खेडेगावं, ते पण मामाचं घर वस्ती वर.
अजून दुसरा असाच प्रसंग काहीसा, जुनं सोडून काहीतरी नवीन घडलं, पण कोणी आक्षेप नाही घेतला. बदल बहुतेक अंगवळणी पडायला लागलेत.
तसं बघितलं तर फार काही revolutionary गोष्टी नाहीत या. पूर्वीपासूनची चालत आलेली बायकांची काम आता पुरुष करू लागलेत. शहरांमध्ये जास्त सवयीची झालीत हि दृश्य. गावच्या या फेरीत गावाकडे पण दिसू लागलेला हा बदल भावला जरा मला. म्हणून तो शब्दात मांडायचा हा अट्टहास.
काल - परवा लोकसत्ताच्या पुरवणी मध्ये पण असाच काहीसा लेख वाचला. आशय एकच दोन्हीचा पण. पण बदल दिसत आहेत. आणि या बदलांना थोडं बोलकं केलं ना कि यांची पण गती वाढते हो. म्हणून बोलत जावं असं काही नवीन घडलं की
नवीन आहेत गोष्टी अजून, रुळायला वेळ लागेलच...

Nice concept,aap achhi writter Ho keep it up
ReplyDelete