Corona... Corona...
Sitting at Swargate Bus Depot, waiting for my bus to home. My head is still spinning. शुद्ध मराठीत अजूनही गरगरतय डोकं . 9 वाजता पोहोचले इथे . धावत पळत , जस मी नेहमीच करते.
9 ची बसच नव्हती पण. थेट 10. अरे देवा !वाट पाहावी लागणार. बसले मग. फार काही गर्दी नाहीये इथे.
मधेच असं घरी जायचं कारण म्हणजे तो कोरोना .
What the heck it has become!
मला बिलकुल इच्छा नाहीये घरी जायची अजूनही. But still I am in the bus. Enroute to home.
आज दुपारी क्लासला गेले होते. सगळे एकदम पॅक. नेहमी सारखी मस्ती नाही. सगळं जस धास्तावलेलं. कोणी खोकल तर लगेच सगळे अलर्ट. त्यात भर म्हणून मला मागचा महिनाभर पासून खोकला. उद्या पासून क्लास नाहीयेत - कोरोनाची नको असलेली कृपा. लायब्ररी नेहमी सारखी नाहीये. मेस चालवणारे काका आणि काकूंना पडलेली काळजी - पोर घरी निघालेत म्हणून पडणाऱ्या अनिश्चित सुट्ट्या, बिघडलेलं आणि अजून जे बिघडणार आहे असं पैशाचं गणित. कॉलेजला सुट्टी आहे पण परीक्षा ठरलेल्या वेळेनुसार होणार अशी आड की विहीर आलेली नोटीस.
Sanitisers साठी अचानक वाढलेली मागणी आणि मग पुढच्या 24 तासात बाजारात आलेली नकली sanitisers. आणि अशा बऱ्याच गोष्टी. एकीकडे लोक आपली दुकान बंद करून गावी निघालेत तर काल परवा पासून लायब्ररीजवळच्या चौकात एका काकूंनी आपल लहानसं फुलांच्या हाराच दुकान लावलं आहे . त्यांना तिळमात्र कल्पना तरी असेल का कि जगाच्या पाठीवर काय सुरु आहे.
अमेरिकेत येऊ घातलेली आणीबाणी, इटलीच बिघडलेलं गणित आणि तो मेलेल्यांचा आकडा, चीन, पुण्यात आलेले ते लोक, तो टॅक्सी वाला ड्रायव्हर, त्याचे घरचे, काम करणारे सगळे लोक, अधिकारी वर्ग.
Everybody is living in uncertainty and moving towards unknown and unpredictable future, like always but still not in the way it always does. Everything is just not normal.
जे कोणी येईल ते काहीतरी नवीनच सांगतंय. जे फ्री आहेत ते आपापल्या वाटेला लागले. परीक्षा वाले जाऊ कि नको यात अडकलेत .
माझं डोकं अजूनही गरगर करत आहे. जाऊन जाऊन कुठवर जाणार आहोत ?
आज सर क्लास मधे म्हणाले कि आम्ही अजून एखादा एपिडेमीक पहिला नाहीये. आम्ही म्हणजे आताची पिढी. Techno-savy people. खरच आहे म्हणा. मला तरी नाही आठवत आहे असं काही भयाण मी अनुभवलेलं. स्वाइन फ्लु आला होता तेव्हा मी पुण्यात नव्हते. फक्त टीव्ही वर पाहिला होता.
आज पुण्यात कोरोना सोबत जगताना कळतंय तेव्हा कशी परिस्थिती असेल. तर एपिडेमीक पहिला नाही - म्हणून खूप लोक अजूनही गोष्टी पाहिजे तेवढ्या सिरीयस नाही घेत आहेत. केवढे ते tik tok बनले आहेत कोरोना वर, आम्ही पण काही मागे नव्हतो त्यात. रूम वर खूप जोक्स करुन झालेत त्यावर . ते पण त्या कोरोना नामक भीतीच्या सावटाखाली.
लोक आपापल्या परीने शक्य ती काळजी घेत आहेत.
परिस्थिती नियंत्रणात राहील कि अजून बिघडेल कि सुधारेल काही सांगता येत नाहीये .
सगळं असं blank झालाय .
आशा आहे की सगळं लवकर नीट होईल.
फिंगर्स crossed !
And happy journey to me!

मनातली अस्वस्थता खूपच छान पद्धतीने मांडली आहेस. लवकर ही परिस्थिती पूर्ववत होईल अशी आशा करूयात.
ReplyDeleteWill pray for the World...
DeleteYup.
Deleteखूप छान मांडलय...तु हे लिहून साधारण १२ दिवस झालेत...
ReplyDeleteसध्या सगळ जग ठप्प झालय.पुढच्या २१ दिवसांत पूर्ववत व्हावं सगळं अशी आशा आणि प्रार्थना करुयात ,सगळ लवकरच पूर्ववत होईल.
🤞🤞
DeleteGüd initiative... Keep it..but try to write more stories it will help us for essay writing 🙂
DeleteThanks
Deleteतू हे लिहलं त्या दिवसापासून 6 महिण्यापेक्षा जास्त वेळ उलटून गेला &
ReplyDeleteपरिस्थिती समोर आहे..��
#Still Finger Crossed����
Hopeful😄
Delete