माझा अवतार बघायचा राहिलाय...

अवतार मूवी बद्दल बोलतीये मी.
स्टोरी सुरु होते जानेवारी महिन्यात. माझा एक मित्र आहे - तो घरी चालला होता. त्याआधी आम्ही भेटलो तर त्याने नेहमीसारख मला काही मूवीज शेअर केले. अवतार पण घे म्हणाला, पण माझ्या फोनची मेमरी फुल झाली होती. मग मी म्हंटलं नंतर घेते .
नंतर 31 ला त्याला स्टेशनला सोडवायला गेले, तिथे पण त्याने आठवण केली की घे movie. आता असेल मोबाईल मध्ये जागा ; पण ट्रेन लगेच निघाली. तो पण मुहूर्त हुकला. परत जवळपास पंधरा वीस दिवसांनी त्यांनी पुन्हा आठवण केली. अवतार तसा बघितलाय मी आधी. पण खूप आधी. आता फारसं काही आठवत नाहीये त्यातलं.  मग finally घेतला मी त्याचाकडून अवतार मोबाईलमध्ये  आणि लगेच लॅपटॉप मध्ये टाकला , मैत्रिणीच्या, माझी रूम पार्टनर.

त्या दिवशी काही माझा मूड नव्हता लगेच मूवी बघायचा. नंतर असच टाळाटाळ होत राहिली. त्यात "लॅपटॉपवरच बघ मूवी" असा त्याचा सल्ला होता.
मोबाइलमध्ये असलं की आठवत ना लगेच फाइल्स चेक करताना, लॅपटॉप वर लक्षच नाही गेलं.

आणि मग या कोरोना ने घोळ घातला.
दोन चार दिवसातच सगळं change, सगळे आपापल्या घरी, तो त्याच्या घरी, मी माझ्या घरी आणि लॅपटॉप मैत्रिणीसोबत तिच्या घरी आणि माझा मूवी लॅपटॉपमध्ये.

मला दोन दिवसांपूर्वी, आज दिनांक 17 एप्रिल आहे, अचानक आठवलं - अरे माझा तर मूवी बघायचा राहिलाय.  कधी योग येईल आता कोण जाणे ?

माझा तर फक्त मूवी राहिलाय, बाकी लोकांचं काय काय राहील असेल ना. केवढे प्लॅन्स असतात आपले. भविष्याचे.  हे करायचंय , ते करायचंय , इकडे जायचंय, हा plan, तो इव्हेंट, ती स्पर्धा, त्याच गिफ्ट, ही ट्रीट, आणि बरंच काही...

Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. शेवटच्या तीन ओळी खूप छान आहेत..! 'Exam साठी शेवटचं वर्ष अभ्यास करू' अशा विद्यार्थ्यांना ही खूप अवघड परिस्थितीला सामना करावा लागणार आहे..! अन् तूर्तास तुला बोलायचं राहूनच गेलं🤔

    ReplyDelete
  3. छान लिहलयस👍👍
    माझं तर लग्न Pending राहिलंय😂😂🤣

    ReplyDelete
  4. 👏👏👏👏👏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रस्ते

In/Formal

I won the Chess game...